आरपीएफ कार्यकारीणीची बैठक संपन्न

0

भुसावळ। शहरातील रेल्वे क्रीडांगण शेजारील ऑल इंडिया रेल्वे सुरक्षा बल संघटनेची बैठक डीएक्स संघटनेचे मध्य रेल्वे क्षेत्रीय महामंत्री राजेश मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत भुसावळ येथील विभागीय अध्यक्ष विनोद लांजीवार, विभागीय सचिव रोशन सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. महामंत्री, विभागिय अध्यक्ष व सचिव यांंनी आरपीएफ सदस्य कर्मचार्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या व समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार असल्याचे आश्वासन उपस्थित सदस्यांना दिले.

संघटन सचिवपदी रोशन जमीर बिनविरोध
बैठकीत भुसावळ विभागीय संघटन सचिवपदी रोशन जमीर यांची बिनविरोध निवड करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. संघटनेचे समाधान वाहुळकर यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.