नवी दिल्ली : ऐन मार्च महिन्यात आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आरबीआयला मोठा धक्का बसला आहे. महागाई, जीडीपीमध्ये घसरण यांसारखी आव्हाने अर्थव्यवस्थेसमोर असताना आणि मार्च मार्च एंडिंग असताना विश्वनाथन यांचा राजीनामा दिला असल्याने आरबीआयला मोठा धक्का बसला आहे.
प्रकृतीचे कारण देत विश्वनाथन यांनी आपण राजीनामा दिला आहे. आरबीआयमधील उच्च पदस्थ अधिकारी यांनी राजीनामा देण्याची ही एका वर्षातील तिसरी वेळ आहे. 31 मार्चला विश्वनाथन हे आपले पद सोडणार आहेत. जवळपास 40 वर्षांची कारकीर्द असलेले विश्वनाथन हे जून महिन्यात निवृत्त होणार होते, मात्र त्यांनी मुदतीआधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.