आरबीके स्कूलला विजेतेपद

0

ठाणे । अस्मिता स्पोर्ट्स क्लब आणि मीरा भाईंदर स्केटलथॉन संघटना आयोजित जिल्हास्तरीय स्केटलथॉन स्पर्धेचे विजेतेपद आर.बी.के. ग्लोबल स्कूल ने पटकावले तर उपविजेतेपद डॉन बास्को स्कूल व जिसीसी इंटरनॅशनल स्कूल यांनी मिळवले. तर युनिव्हर्सल क्लब ने तृतीय स्थान पटकावले. विविध चार प्रकारांमध्ये झालेल्या स्केटलथॉन या स्पर्धेत जिल्ह्यातील 430 स्पर्धक नि सहभाग घेऊन स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला, या स्पर्धेतील विजेते खेळाडू पुणे येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्केटलथॉन स्पर्धेत मीरा भाईंदर महापालिका जिल्हा यांचे प्रतिनिधित्व करतील असे सचिव संतोष मिश्रा यांनी सांगितले.

स्पर्धेचे उद्घाटन राज्य स्केटिंग संघटनचे उपाध्यक्ष व ठाणे स्केटिंग सचिव गणेश राव यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाले, याप्रसंगी, आफ्रिन सय्यद, अमित राव, व अविनाश ओंबासे, उपस्थित होते. स्पर्धेला पालकांनी ही मोठा प्रतिसाद दिला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कमलेश सिंग, संदीप माने, प्रफुल्ल खरात, साहिल शेख, झीशान शेख , डॅनिया खान, सौरभ भट्ट यांनी परिश्रम घेतले.

अथर्व रसाळ, आदित्य मिश्रा,अर्श जाफरी, पुरभ कनोरिया, वेदांत वर्मा, सोहम काळसेकर, वैभवी बालशुभ्रमन्याम, निदा सवणुर, प्रणव सोलनकी, ईशान शर्मा, पलकशी मेहता, अरमान सय्यद, पेरलीन अमीन, यशीता जोशी, सुयश सिंग, सौर्या राय, देव विश्वकर्मा, धून पटेल, आज्ञा बरणवाल, रक्षा देऊलकर, अदिती सिंग, निहार पटेल, दिया पारेख, अंश जैन, विश्वजीत सिंग, पूर्ण भन्साळी, माही ठक्कर, सौर्या देसाई, सारस नानावटी, आदिती गोयल, मंथन सुर्ती.