अमळनेर । राष्ट्रीय केमिकल्स अँन्ड फर्टिलायझर लि. जळगाव मार्फत अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथे किसान सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. मंगरुळ येथील महाजन कृषी सेवा केंद्रावर किसान सुविधा केंद्र सुरु होणार आहे. या केंद्राचे उद्घाटन जिल्हा कृषी अधिकारी सुरेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. किसान सुविधा केंद्रात शेतकर्यांना मोफत नत्र, स्फुरद, पालाश, व सूक्ष्म अन्नद्रव्य तपासणी साठी माती संकलन करून त्याचे निदानाबद्दल माहिती मिळणार आहे.
400 हून अधिक शेतकरी उपस्थिती
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेंद्र पाटील यांनी मार्गदर्शनात शेतकर्यांना गुणवत्ता, नियंत्रण व कृषी निविदे बद्दल घ्यावयाची खबरदारी या विषयी मार्गदर्शन दिले. आरसीएफचे विभागीय अधिकारी विजयकुमार सोनवणे यांनी शेताकर्यांना किसान सुविधा केंद्राबद्दल सखोल माहिती दिली. या कार्यक्रमास 400 हून अधिक शेतकरी उपस्थित होते. शेतकर्यांनी मातीचे नमूने तपासणी साठी जमा केलेली माती परिक्षण करुन दाखविण्यात आली. शेतकर्यांना प्रोत्साहनपर आरसीएफ सल्फर सूक्ष्म अन्नद्रव्य असलेले माइक्रोला, पाण्यात विरघळनारे सुजला ,19.19.19, स्फुरद, विरघळनारे जीवाणु बायोला हे सोडतद्वारे पाच शेतकर्यांला देण्यात आले. याप्रसंगी ए. टी.आहेर, बिपिन धटावकर, कृषी विज्ञान केंद्राचे शास्रज्ञ किरण जाधव, कापूस पिक तज्ञ रामेश्वर चांडक, जिल्हा प्रभारी योगेश वेंगुरलेकर, वरिष्ठ अधिकारी बजरंग कापसे हे उपस्थित होते.