बैगळुरू । रॉयल चॅलेजर बैगळुरू संघाचे प्रदर्शन व आरसीबीचा कर्णधार विराट कोहली याबद्दल माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला की, या सिझनमध्ये आरसीबीचे प्रदर्शन चांगले नाही आहे. संघात विराट कोहलीची कमतरता भासत आहे.संघात त्यांच्या प्रभावी नेतृत्वाची कमतरता भासत आहे.
कोहलीच्या कर्णधार पदाची स्तुती करतांना गांगुली म्हणाला की, तो सहासी व उत्साहाने भरलेला कर्णधार आहे,जो आपल्या संघाला कसा विजय मिळविता येईल एवढेच त्याला माहिती आहे. आरसीबीने आयपीएल 2017 च्या सत्रात सुरवातीच्या सामन्यात चांगले प्रदर्शन केलेले नाही.आरसीबीने 3 सामन्यता एकच विजय मिळाला आहे. उरलेल्या दोन सामन्यात पराभव झाला. आरसीबीचे महत्वाचे व स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाले असून, त्यामुळे ते संघाबाहेर आहे हा विषय त्याच्यासाठी चितेचा विषय आहे. त्यात आरसीबाचा कर्णधार विराट कोहलीसुध्दा सहभागी आहे.गेल्यावेळेस विराटच्या नेतृत्वात आरसीबीने अंतिम सामन्यापर्यंत पोहचले होते. त्याच्या नेतृत्वात संघात एक नविन ऊर्जा मिळते.