हैदराबाद: आयपीएल सीजन १२ चा थरार सुरु आहे. आयपीएल सुरु होऊन एक आठवडा झाला आहे. दरम्यान विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघाला या मोसमात पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. आज रविवारी त्यांना सनरायझर्स हैदराबादचा सामना करावा लागणार आहे. बंगळुरूला आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे, तर हैदराबादने दोन सामन्यांत एक विजय मिळवला आहे. हैदराबादने मागच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचे १९९ धावांचे लक्ष्य सहज पार केले होते आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला आहे. बंगळुरूच्या तगड्या फलंदाजांसमोर त्यांना निभाव कसा लागतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.