वसई । एमएमआरडीएच्या हरकती सुनावणीसाठी शिवसेना भाजप वगळता जनआंदोलन समितीच्यानेत्या व कार्यकर्त्यांनी नालासोपारा येथील दामोदर सभागृहात हजेरी लावली. व आपली भूमिका मांडली बहुजन विकास आघाडीचे आमदार व इतर पदाधिकारी मात्र वाहतूक कोंडीमुळे सभागृहात वेळेत पोहोचू शकले नाहीत. त्यानंतर सुनावणी तहकूब झाली. आ. हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर, उपमहापौर उमेश नाईक व माजी महापौर नारायण मानकर या सुनावणीला उपस्थित राहणार होते, अशी माहिती नारायण मानकर यांनी दिली.
वसईतून 40 हजार हरकती
सभा तहकूब झाल्यानंतर दुपारच्या सत्रात काहींनी सुनावणी घेण्याचा अधिकार्यांचा प्रयत्न हाणून पाडला. एकट्या वसईतून 40 हजार हरकती या आराखड्यावर नोंदवण्यात आल्या. गावागावात सुनावणी घेऊन प्रत्येकाचे म्हणने ऐकून घ्या. अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती. सुनावणीसाठी एमएमआरडीएने त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली. एमएमआरडीएच्या प्रमुख नियोजनकार उमा उडुमनिल्ली व माजी नियोजनकार डी. के. पाठक यांनी सुनावनीला सुरुवात केली. आदिवासी एकता परिषदेने या सुनावणीला विरोध केला. ही सुनावणी स्थगित केली असून लोकांच्या भावना शासनास आम्ही कळवू असे आंदोलनकर्त्यांना सुनावणी घेण्यासाठी आलेल्या समिती सदस्यांनी सांगितले.