मुंबई । मुसळधार पावसामुळे आरेमध्ये कोसळलेल्या पुलाचे बांधकाम जानेवारी (2018) च्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी जोगेश्वरी विधानसभेचे आमदार तसेच राज्यमंत्री रविंद्र वायकर यांना दिले. त्याचप्रमाणे आरेतील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून ते ही 15 दिवसांत पुर्ण करण्यात असल्याचे वायकर यांनी यावेळी सांगितले. आरे वसाहतीमधील मुख्य रस्त्यावरील कृषी उद्योग येथील पुलाच्या दुरुस्ती संदर्भात अक्षम्य दिरंगाई होत असल्याबाबत तसेच अन्य समस्यांबाबत आपला एक मित्र प्रतिष्ठान यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. याची माहिती मिळताच राज्यमंत्री वायकर यांनी आपल्या कार्यालयात बैठक बोलावली.