मुंबई : पर्यावरणाचा र्हापस होणार यामुळे मुंबई मेट्रो रेल्वेच्या आरे येथील प्रस्तावित मेट्रो भवनाला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला. आजही त्यांचा विरोध कायम आहे. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने याला कडाडून विरोध केला आहे. असे असूनही आरे येथे होणार्याा मेट्रो भवनाच्या बांधकामाला कुणीही आडवू शकणार नाही. कारण मेट्रो भवनाचे बांधकाम डिसेंबर महिन्यापर्यंत सुरू होणार आहे.
जागेचा अडथळा झाला दूर
एमएमआरडीए ही मेट्रो रेल्वे प्रकल्पासंबंधीची मुख्य यंत्रणा आहे. एमएमआरडीने सर्वप्रथम फेबुवारीमध्ये सरकारला पत्र लिहून मेट्रोच्या कारशेड आणि मेट्रो भवनासाठी आरे वसाहतीमधील भुखंड देण्याची मागणी केली होती. ज्यामुळे मध्यमागी राहून संपूर्ण मेट्रो लाइनवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. यासाठी 20 हजार 387 चौ.मी. अथवा 5.03 एकर जागेची मागणी करण्यात आली. दरम्यान आरे दुग्ध विकास महामंडळाने हा भूखड देऊ केल्याने या मार्गातील अर्ध्याहून अधिक अडचणी दूर झाल्या.
भूखंड हिरव्या पट्ट्यापासून दूर
दरम्यान मेट्रो भवनाचा आराखडा ठरवण्याचे काम आता युद्धपातळीवर सुरू झाले आहे. दहिसर ते अंधेरी मेट्रो लाइन 2019पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी मेट्रो भवनही उभारण्यात येत आहे, असे एमएमआरडीच्या अधिकार्यांपनी सांगितले. दरम्यान 7 हजार 500 चौ.मी. मेट्रो भवनाचा भूखंड हा बफर झोन अथवा हिरव्या पट्टयातील नसून तो पश्चिम द्रूतगती महामार्गालगतचा आहे. मेट्रो भवनाचा आराखडा निश्चित झाल्यानंतर त्वरित याची निविदा काढण्यात येणार आहे. हे मेट्रो भवन मेट्रो रेल्वेचे मुख्यालय असणार आहे.