आरे कॉलनीत महिलेचा मृतदेह आढळला

0

मुंबई – गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीत पिकनिक पॉइंट जवळील कोंबड पद येथे एका अंदाजे ४५ वय वर्ष असलेल्या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे आरे परिसरात एकच खळबळ उडालेली दिसते. सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी संशयितला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ८ च्या दरम्यान पोलिसांना कोंबड पाड्यात रस्त्याचा बाजूला जगलात एका महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरु केली असता ही महिला एम आय डीसी भागातील असून तिला रात्रीच्या वेळेस या भागात आणून टाकल्याचे प्रथम तपासणीत निदर्शनास आले आहे. या महिलेच्या डोक्याच्या मागच्या भागाला जखम झाली असून या महिलेवर अत्याचार झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मृत महिलेला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. संशयित आरोपी हा एम आय दि सी परिसरातील एका ऑफीसचा वॉचमेन असून त्याने हे कृत्य का केले हे अद्याप समोर आलेले नाही.