जळगाव। येथील आरोग्यदीप किडनी फाऊंडेशन तर्फे मधुमेह व किडनी विकाराविषयी जनजागृती व्हावी या हेतूने जाहिर प्रदर्शन व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष डॉ.शशिकांत गाजरे यांनी दिली आहे. लेवा बोर्डिंग हॉलमध्ये शनिवार15 रोजी सकाळी 10 वाजता जनजागृती प्रदर्शनाचे उद्घाटन रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ.सुभाष चौधरी यांच्या हस्ते व उद्योजक अरूण नारखेडे यांच्या उपस्थितीत होणार होईल. तसेच प्रदर्शन 15 व 16 असे दोन दिवस सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी विनामुल्य खुले राहणार आहे.
या विषयांवर होणार व्याख्यान
जिल्ह्यातील डॉक्टरांसाठी रविवार16 रोजी सकाळी 10.30 वाजता हॉटेल रॉयल पॅलेस येथे सी.एम.ई. चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार 16 रोजी दुपारी 3 वाजता हॉटेल रॉयल पॅलेस येथे फाऊंडेशन तर्फे मधुमेहाचा प्रतिबंध या विषयावर डॉ.हिमांशू पाटील (नागपूर), औषधी व किडनी विकार या विषयावर डॉ.चंदन चौधरी (जसलोक हॉस्पीटल, मुंबई) आणि चमत्कारीक किडनी या विषयावर डॉ.दिनेश महाजन (के.ई.एम हॉस्पीटल, मुंबई) आदि मान्यवर तज्ज्ञ डॉक्टरांचे व्याख्याने होणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने या विनामुल्य व्याख्यानांना उपस्थिती द्यावी असे आवाहन आरोग्यदीप किडनी फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे. तसेच कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.