मुंबई । सार्वजनिक आरोग्य हा शासनाच्या प्राधान्यक्रमाचा विषय असून तो सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित असलेला विषय आहे. जनसामान्यांच्या आयुष्यातील या गोष्टीचे महत्व लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी, औषधी खरेदी करण्यासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मंळगवारी सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
प्रशासकीय कामाचा घेतला आढावा
या बैठकीस वैद्यकीय शिक्षण सचिव संजय देशमुख, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डी.के बालपांडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाचाही आढावा घेतला. या महाविद्यालयातील रिक्त तसेच भरलेल्या जागा, इमारतींचे बांधकाम, यंत्रसामग्रीची खरेदी याचा यात समावेश होता. चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे काम ठराविक कालमर्यादा निश्चित करून पूर्ण करावे.