आरोग्यासाठी उतारवयात दिनचर्या बदलवायला हवी

0

भुसावळ। उत्तम आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक स्वास्थाचा योग्य मिलाप आहे. शारीरिक, मानसिक आरोग्य जपायचे असेल तर तरुणपणी असलेल्या सवयी ह्या उतारवयात नक्कीच बदलवायला हवेत, असा सल्ला भुसावळ पतंजली आरोग्य केंद्राचे वैद्य योगेंद्र कासट यांनी येथे दिला. जळगाव रोड परिसरील जेष्ठ नागरिक संघातर्फे डॉ.नि.तु.पाटील यांच्या संकल्पनेनुसार ‘विशेष आरोग्य वर्ष 2017’ अंतर्गत झालेल्या ‘आयुर्वेद एक वरदान’ या विषयावर ते बोलत होते. डॉ.पाटील यांच्या अभियानाचे त्यांनी कौतुक केले.

आयुर्वेदातून होईल आयुष्याची शंभरी पार
कासट पुढे ते म्हणाले की, आपल्या शरीरातील सप्त धातु म्हणजे रस, रक्त,मांस,मेध,अस्थी,मज्जा,शुक्र व त्रिदोष म्हणजे वात, पित्त, कप, आणि त्रिमल म्हणजे मल, मूत्र, स्वेद यांचे सुयोग्य प्रमाण शरीरात असेल तर नक्कीच तुम्ही वयाची शंभरी पार करू शकतात त्यासाठी
आयुर्वेद वरदान आहे.

यांची होती उपस्थिती
उपस्थितांच्या प्रश्‍नांचे वैद्य कासट यांनी सरळ-सोप्या भाषेत निरसन केले. प्रसंगी विश्‍वनाथ वाणी, पुरूषोत्तम कुलकर्णी, तुकाराम पाटील, विठ्ठल पाटील, यशवंत वारके डॉ.अशोक डाके, राजेश चौधरी, वैशाली पाटील, प्रमिला चौधरी, चाबू झांबरे, मालती जगताप, सुनंदा जंगले, इंदू बहाले, लता चौधरी, मधुकर जगताप, मुरलीधर इसे, शरद कोलाडकर, भानुदास पाटील, प्रमोद बोरोले, लोटू फिरके, पी.डी.कुलकर्णी, रूपा पाटील, मुकुंद वारके आदी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक धनराज पाटील तर आभार प्रदर्शन प्रभाकर झांबरे यांनी मानले.

अभिनंदन ठराव मंजूर
आपले वाचनालय भुसावळ यांच्या वतीने डॉ.नि.तु.पाटील यांना सानेगुरुजी समाजसेवा गौरव पुरस्कार 2017 आमदार एकनाथराव खडसे यांच्याहस्ते देण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सत्कार आणि अभिनंदनाचा ठराव मंजूर झाला.