आरोग्य अधिकार्‍याने केली मक्तेदारांवर दंडात्मक कारवाई

0

जळगाव । महापालिकेच्या युनीट क्र. 7 बहिणाबाई उद्यान, गणेश कॉलनी, रिंग रोड, हरीश्वर नगर, ब्रुक बाँड कॉलनी येथे आरोग्य अधिकार्‍यांनी तपासणी केली. या तपासणीत कायम 3 कर्मचार्‍यांना दैनंदिन काम करीत नसल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर एस आय जे. के. किरंगे व एस. के. खान यांना कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. वार्ड क्र. 24मधील मक्तेदार पुजा महिला बचत गट यांना 1500 रूपयांचा दंड करण्यात आला. मक्तेदाराच्या गाडीवर नंबर प्लेट आढळून, ओला व सुका कचरा असे लिहीलेले आढळून आले नाही. तर वार्ड क्र. 25 मध्ये कचरा कुंडी साफ केली. नसल्याने मक्तेदार अंबर महिला बचत गट यांना 500 रूपयांचा दंड करण्यात आला आहे. तसेच वार्ड क्र. 26 मध्ये कचरा कुंडीतील कचरा बाहेर पडलेला दिसल्याने मक्तेदार वैभव लक्ष्मी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाला 500 रूपयांचा दंड करण्यात आला आहे.