आरोग्य कर्मचारी, कोरोना बाधित रुग्ण, नातेवाईकांसाठी आनापान साधना प्रशिक्षण

जळगाव- शांतता, तणावमुक्ती व भयमुक्तीसाठी आनापान साधना प्रशिक्षण महत्वपूर्ण असून जिल्ह्यातील जे आरोग्य कर्मचारी, कोरोना वॅरियर्स, कोविड रुगण व त्यांचे नातेवाईक यांना या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आपली नोंदणी करुन या मोफत प्रशिक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे.
कोविड वॉरियर्सना म्हणजेच आरोग्य कर्मचारी कोरोनाशी लढा देतांना स्वत: आजारी पडत आहेत. त्यांच्यात तणाव, भय, अशांतता वाढतेय. ताण-तणाव कमी करण्यासाठी विपश्यना करणे महत्वाचे असून आनापान साधना ही विपश्यनेची पहिली पायरी आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी स्वत:ला शांत, भयमुक्त ठेवण आवश्यक आहे. ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती सुधारेल. तसेच सायटोकिन स्टॉर्मपासून बचाव करण्यास मदत होईल, असे प्रयत्न राज्यात केले जात आहेत.