आरोग्य कर्मचार्‍यांच्या समस्या मार्गी लावणार

0

मुंबई । राज्यातील जिल्हा परिषद आरोग्य कर्मचार्‍यांच्या पदोन्नती, पद पुनरुज्जीवन व इतर समस्या लवकरच मार्गी लावण्यात येतील.त्या संदर्भात सर्व जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागाचा आढावा घेतला जाईल असे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांनी सांगितले. भारतीय जनता कामगार महासंघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद आरोग्य कर्मचार्‍यांच्या विविध समस्यांबाबत मंत्रालयात देशमुख यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीत भारतीय जनता कामगार महासंघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद आरोग्य कर्मचार्‍यांच्या विविध समस्यांबाबत निवेदने देशमुख यांना दिली. यावेळी देशमुख म्हणाले की, जिल्हा परिषदेतील आरोग्य सहाय्यकांना लवकरच त्यांच्या सेवा जेष्ठते नुसार पदोन्नती देण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे. याबरोबरच रिक्त पदे भरण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतले जाईल.त्यासाठी जिल्हा परिषदांच्या आर्थिक स्थितीचा अहवाल मागवण्यात आला असून रिक्त पदे भरल्यानंतर त्यांचे वेतन नियमित होण्यासाठी तरतूद केली जाईल, केली जाईल असे ते म्हणाले.