आरोग्य केंद्रात होणार डॉक्टरांची नियुक्ती

0

भुसावळ। पालिकेतील आरोग्य समितीमार्फत विविध ठरावांसाठी नियामक समितीची बैठक बुधवार 29 रोजी पालिका सभागृहात पार पडली. यामध्ये शहरातील चारही आरोग्य केंद्रांत मानधन तत्वावर बालरोग तज्ञ, स्त्रीरोगतज्ञ आणि फिजीशियन अशा चार वैद्यकिय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्याच्या येण्याच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. याप्रसंगी सभापती दिपाली बर्‍हाटे, मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर उपस्थित होते.

या विषयांना मिळाली मंजूरी
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत नियामक समितीची बैठकीत शहरातील नागरि प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांकरीता स्वच्छ पाण्याच्या सोयीकरीता वॉटर फिल्टर बसविण्यासाठी 14 हजार रुपये खर्च, वॉटर कुलरसाठी 22 हजार रुपये, आरोग्य केंद्रात येणार्‍या रुग्णांचे उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी एअर कुलर खरेदीसाठी 7 हजार रुपये, कार्यालयीन कामकाजाच्या सोयीकरीता संगणक खरेदी करण्यासाठी 30 हजार रुपये, कार्यालयीन छपाईसाठी 10 हजार रुपये, इतर साहित्य खरेदीसाठी 15 हजार रुपये तसचे वैद्यकिय अधिकार्‍यांची नियुक्ती करुन त्यांना दरमहा 4 भेटीसाठी प्रतीभेट 2 हजार रुपये प्रमाणे करारावर नियुक्त्या करणे या विषयांना मंजूरी देण्यात आली. यावेळी डॉ. नितु पाटील यांनी रुग्णालय समितीमार्फत समिती सदस्यांची नावे व दूरध्वनी क्रमांकांचे फलक लावल्यास यातून नागरिकांना तक्रारी देखील करता येतील या ठरावा देखील मंजूरी देण्यात आली.