आरोग्य केंद्र दुरुस्तीसाठी चार कोटींचा निधी

0

जळगाव। जिल्ह्यातील चोपडा, रावेर, यावल येथील आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी आणि पेंव्हींग ब्लॉक बसविण्यासाठी निवडणूक आचारसंहिता लागु होण्या अगोदर मागील आरोग्य समितीच्या बैठकीत 3 कोटी 92 लाख 48 हजार 341 एवढ्या निधिंचा निविदा जाहिर करण्यात आले होते. निविदेनुसार आचारसंहितेनंतर या निधीचे वितरण करण्याच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे.

आरोग्य समिती सभापती सुरेश धनके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत निधी वितरणास मंजुरी देण्यात आली. कर्मचारी निवासस्थान, विद्युतीकरण आदी कामे याअंतर्गत केली जाणार आहे. कुटुंब कल्याण, साथरोग, शालेय आरोग्य, माता, बाल संगोपन, कुष्टरोग तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राच्या बांधकाम आणि दुरुस्ती विषयी याविषयी या बैठकीत आढावा घेण्यात आला. एक हजार लोकसंख्येमागे 1 आशा कर्मचारी असे धारेण आहे. पण पुरेशा प्रमाणात आशा कर्मचारी उपस्थित नसल्याने पाच हजार लोकसंख्येमागे एक आशा कर्मचारी काम करीत असल्याने त्यांच्यावर कामाचा बोजवारा आहे. त्यामुळे कामावर परिणाम होत असल्याचे जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटील यांनी सांगितले. सभेस जिल्हा परिषद सदस्य संदिप पाटील, कोकीळाबाई पाटील तसेच सवृ वेद्यकिय अधिकारी तालुका वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.