माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांची उपस्थिती
चाळीसगाव – रोटरी मिलेनियम चाळीसगावच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आरोग्य जनजागृती गणेशोत्सव अभियानाचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्याहस्ते रविवारी करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
सदरचा जनजागृती चित्ररथ गणेशोत्सव काळात तालुकाभर आरोग्य जनजागृती करणार आहे. यावेळी माजी आमदार राजीवदादा देशमुख, महिला व बाल कल्याण सभापती रंजनाताई सोनवणे, नगरसेवक भगवान राजपुत, श्याम देशमुख, रामचंद्र जाधव, दिपक पाटील, अध्यक्ष डॉ. प्रमोद सोनवणे, सेक्रेटरी केतन बुंदेलखंडी, संस्थापक अध्यक्ष प्रितेश कटारिया, प्रकल्प प्रमुख मयूर शिंदे, महेश महाजन, श्रेणीक सोलंकी, गोविंद वर्मा व सर्व रोटरी मिलेनियम सदस्य, मान्यवर उपस्थित होते.