आरोग्य जागृती कार्यक्रमाचे आयोजन

0

महिला दिनानिमित्त रक्तक्षय व मुखरोग तपासणी

नारायणगाव : ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यालयातील माता-पालक संघ, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव आणि इंडियन डेंटल असोसिएशन शिवनेरी, जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य जागृती कार्यक्रमांतर्गत ‘रक्तक्षय’ जाणीव जागृती तसेच महिला दंत व मुखरोग तपासणीचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती पालक संघाचे अध्यक्ष व मुख्याध्यापक रविंद्र वाघोले यांनी दिली.

कार्यक्रमाचे उद्घाटन मोनिका अनिल मेहेर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. सुषमा कुलकर्णी, पुष्पा पाटे, अंजली पारगावकर, व्याख्याते निवेदिता डावखर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रशांत शेटे, मुख्याध्यापक रविंद्र वाघोले, राहुल घाडगे, डॉ. अरुणा पोथरकर, डॉ. पल्लवी लोखंडे, डॉ. सारिका फुलवडे, डॉ. स्नेहल घाडगे, पालकसंघाच्या उपाध्यक्षा पूनम भोर, पुष्पा आरोटे, माता – पालक संघाच्या सचिव अनुपमा पाटे, पालक संघाचे सचिव मेहबूब काझी, उपसरपंच परशुराम वारुळे, राहुल नवले, पर्यवेक्षिका रंजना बोर्‍हाडे, अनुराधा पुरानिक, तृप्ती डेरे, वनिता वायकर इ. मान्यवर माता – पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्त्रीयांच्या आजारावर मार्गदर्शन
रक्तक्षय (अ‍ॅनेमीया) याविषयी निवेदिता डावखर यांनी कारणे आहार व प्रतिबंधक उपाय या विषयावर व्याख्यान दिले. कृषी विज्ञान केंद्राने प्रकाशित केलेल्या ‘अ‍ॅनेमीया’ या पुस्तकाचे सर्व महिलांना मोफत वाटप करण्यात आले. प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. सुषमा कुलकर्णी यांनी स्त्रियांमधील जाणवणारे विविध आजार आणि उपाय याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

महिलांची दंततपासणी
इंडियन डेंटल असोसिएशनच्या शिवनेरी जुन्नर शाखेच्या वतीने सुमारे 200 महिलांचे मुखरोग व दंत चिकित्सा करण्यात आली. उपस्थित सर्व महिलांना लोहयुक्त गोळ्यांचे व जंताच्या गोळ्या मोफत देण्यात आल्या. कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने पूरक आहार म्हणून राजगीरा लाडू, केळीचे वाटप करण्यात आले.