जळगाव । घंटागाडी, कचरा गाडी किंवा इतर आरोग्य विभाग वाहनांचे जीपीएसवर आधारीत बिले अदा करण्याचे आदेश आरोग्य अधिकार्यांना आयुक्त जीवन सोनवणे यांनी शुक्रवारी दिले आहेत. आरोग्य अधिकार्यांनी कचरा संकलनाची बिले बनवितांना त्यांना जीपीएस रिर्पार्ट लावणे आवश्यक असून रिपोर्ट असला तरच बिले तपासावित असे आदेश दिले आहेत. जीपीएस रिपोर्ट नसलेल्या बिलांना तपासणीसाठी हात सुद्धा लावू नये असे स्पष्ट निर्देश आयुक्त सोनवणे यांनी दिले आहेत. तसेच ट्रायलनंतर 1 एप्रिलपासून जीपीएस रिपोर्ट यायला लागले आहेत असे निरीक्षण नोंदवित यापुढे नवीन बिले जीपीएस रिपोर्ट आधारेच तपासावेत असे आदेशीत केले आहे. जर 1 एप्रिल पूर्वींची बिले तपासली असतील तर जीपीएस रीपोटप्रमाणे पुन्हा तपासावेत व ती पुन्हा सादर करण्याचे आदेश आरोग्य अधिकार्यांना दिले आहेत.