मुंबई : इंडस हेल्थ प्लसच्या वतीने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सदस्यांसाठी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर तसेच अमोल आणि कांचन नायकवाडी यांच्या उपस्थित शनिवार, 5 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10 वाजता रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे होणार आहे.