आरोग्य शिबीराच्या माध्यमातून 3 हजार 312 रुग्णांची करण्यात आली तपासणी

0

धुळे । भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.माधुरी बोरसे व सुभाष नगर मंडळ भाजपातर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन संत सावता माळी प्राथमिक शाळा येथे करण्यात आले होते. शिबिरात एकूण 3 हजार 312 रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाषजी भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल होते. प्रमुख अतिथी म्हणून विजय पाच्छापूरकर, हिरामण गवळी, चंद्रकांत गुजराथी, रत्नाताई बडगुजर, प्रशांतजी मोराणकर, संजय चौधरी, चंद्रकांत सोनार, भारत देवळे, वैभवीताई दुसाने, दिनेश कांकरिया आदी उपस्थित होते. ना.डॉ.सुभाष भामरे यांनी जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या विविध विकास कामांबद्दल माहिती दिली.

कार्यकर्त्यांचा कौतूक
शिबिराचा समारोप पर्यटन व रोहयोमंत्री जयकुमारजी रावल यांच्या हस्ते झाले. ना.रावल यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक करत, सच्चा कार्यकर्ता ज्याप्रमाणे कुठलीही निवडणूक नसतांना देखील तळागळाच्या लोकांपर्यंत जाऊन त्यांची सेवा करतो त्याच प्रमाणे डॉ.माधुरी बोरसे यांनी निस्वार्थपणे आरोग्य शिबिरांचा धडाका लावला असल्याचे सांगितले. वाजेपेयी यांच्या निरोगी समाजाच्या संकल्पनेची काही अंशी पूर्तता करण्यासाठी शिबिरे राबविण्याचा उपक्रम हाती घेतला असल्याचे प्रास्ताविक करतांना डॉ.माधुरी बोरसे यांनी सांगितले.

2 हजार रुग्यांना औषध
शिबिरात गरजू रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. 162 रुग्णांची कानाची, 63 रुग्णांची हदयाची, 9 रुग्णांची कॅन्सर, 54 रुग्णांवर मूत्रमार्गातील आजार,18 लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, 81 रुग्णांची मणक्यांचे शस्त्रक्रियासाठी सल्ला देण्यात आला. सर्व रुग्णांवर पुढील तपासणी, शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. 2 हजार 223 रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली.

तज्ज्ञ डॉक्टर
शिबिरामध्ये डॉ.माधुरी बोरसे, डॉ.तुषार कानडे, डॉ.राजेश पाटील, डॉ.हर्षद सोनवणे पाटील, डॉ.सुषमा थोरात, डॉ.गीतांजली सोनवणे, डॉ.नितीन पाटील, डॉ.तुषार चव्हाण, डॉ.वसुधा , डॉ.अश्विनी, डॉ.सुधीर सिंघवी, डॉ.फैजी सिद्दिक्की, डॉ.विपुल बाफना, डॉ.रवी सोनवणे, डॉ.संदीप थोरात, डॉ.अमित पाटील, डॉ.सईद पटेल आदी डॉक्टरांनी तपासणी केली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र कापडणीस, राजाभाऊ पारोळेकर, अडव्होकेट सचिनजी जाधव, बंटी रोकडे, अनिल थोरात, जयप्रकाश महाले, हेमंत पटेल, दिनेश गुजर, प्रशांत साळवे, चंद्रकांत आघाव, मिलिंद मोरे, संजय भडागे, राजेश चौधरींनी परिश्रम घेतले.