तहसिलदार व मुख्याधिकार्यांना दिले निवेदन
चाळीसगाव । नगरपालिकेचे आरोग्य सभापती घृष्णेश्वर पाटील यांच्यावर नगरपालिकेत गुंडांकरवी करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून आज भारतीय जनता पक्षाच्या सर्व आघाड्यांच्या वतीने नगरपालिका चाळीसगावचे तहसिलदार व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानानुसार चाळीसगाव शहराच्या आरोग्यासाठी स्वच्छतेच्या बाबतीत प्रामाणिकपणे काम आरोग्य सभापती करत असतात. मात्र वर्षानुवर्ष पासून कामचुकारपणा व भ्रष्टाचाराची सवय असलेल्या नगरपालिकेतील स्वच्छता निरीक्षक व त्याच्या काही सहकार्यांना घृष्णेश्वर पाटील यांचा हा पवित्रा सहन न झाल्यामुळे त्यांनी गुंडांना हाताशी धरून पाटील यांच्यावर ते नगरपालिकेत बसलेले असतांना भ्याड हल्ला केला. ही घटना अतिशय निषेधार्य असून आपल्या कर्तव्याशी प्रतारणा करून गुंडगिरी करणार्या संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, नगराध्यक्षा आशालता विश्वास चव्हाण, दिनेश बोरसे सभापती पं.स. चाळीसगाव, पं.स. उपसभापती संजय भास्कर, गटनेते न.पा. राजेंद्र चौधरी, हिराशेठ बजाज, चंदू तायडे, माना राजपूत, नगरसेवक संजय राजपूत, विजयाताई पवार, आनंद खरात, नितीन पाटील, चिराग शेख, सोमसिंग राजपूत, प्रा. सुनील निकम सरचिटणीस भाजपा, अमोल नानकर सरचिटणीस भाजपा, रोहन सूर्यवंशी युवा मोर्चा अध्यक्ष, अक्षय मराठे भाजपा युवा मोर्चा शहर, नगरसेवक प्रभाकर चौधरी, विश्वास चव्हाण, कैलास गावडे, भरत गोरे, विवेक चौधरी, राजेंद्र पगार, अरुण पाटील, भास्कर पाटील, पप्पू राजपूत, प्रदीप देवरे, जितु गोंधळी, कपिल पाटील, सचिन स्वार, बबडी शेख, राहुल पाटील, मनोज पाटील, आरिफ सय्यद, विवेक साळुंखे, सुभाष पाटील, अमित सुराणा, राकेश बोरसे, बंडू पगार, सचिन आव्हाड, हर्षल चौधरी, वासुदेव पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.