आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मैदानी खेळ महत्वाचे – समाजसेवक डॉ. रविंद्र भोळे   

0

उरुळी कांचन : वैद्यकीय व्यवसाय सांभाळून क्रिकेट सारख्या खेळा मुळे डॉक्टरांचे आरोग्य फिट रहाते व नवीन खेडाळुना चालना मिळते, आरोग्य सदृढ राहण्यासाठी क्रिकेट सारखे मैदानी खेळ महत्वाचे असल्याचे मत जेष्ठ समाज सेवक, प्रवचनकार तसेच उरुळी कांचन डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भोळे ह्यांनी व्यक्त केले.

स्पारटन स्पोर्ट क्रिकेट क्लब उरुळी कांचन डॉक्टर असोसिएशनच्या विद्यमाने निकम स्पोर्ट ग्राउंड येथे पाच दिवसीय क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. अभिजीत दरक,डायरेक्टर योग हास्पिटल, डॉ. राहुल काळभोर, डायरेक्टर शिवम हॉस्पिटल, डॉ. राम, मेडिकल डायरेक्टर विस्वराज हॉस्पिटल, डॉ. अभिजित देवीकर, मुख्य आरोग्य अधिकारी निसर्गोपचार आश्रम, डॉ, गणेश आखाडे, उपाध्यक्ष उरुळीकांचन मेडिकल असोसिएशन, नितीनसेठ कुंजीर, मानसी मेडिकल, संतोष कांचन,अध्यक्ष उरुळी कांचन मेडिकल असोसिएशनचे सर्व  पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विनोद धीवार ,डॉ. समीर ननावरे ह्यांनी केले. क्रिकेट सामने भरविन्याचे हे दुसरे वर्ष असून आयोजन क्रिकेट क्लब मेंबर्स व उरुळी कांचन डॉक्टर असोसिएशनच्या वतीने करण्यात आले.