आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची रयत सेनेची मागणी

0

चाळीसगाव । गरिबांना उपचारासाठी एक्काचे असलेले उपचार केंद्र म्हणजे शासकीय रुग्णालय. मात्र सद्यस्थितीत अनेक शासकीय रुगणालयाची स्थिती गंभीर असुन या ठिकाणी सेवा सुविधांचा अभाव आहे. चाळीसगाव हे शहर तालुक्याचे ठिकाण असुन जिल्ह्यातील हा सर्वात मोठा तालुका आहे. शहरात एकमेव ग्रामीण रुग्णालय आहे. एकमेव रुग्णालय असल्याने या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. रुग्णांसाठी पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. सद्यस्थिती रुग्णालयालाच आजारातून बाहेर काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. रुग्णालयात आवश्यक असलेल्या साधन सामग्री उपलब्ध करून देण्याची मागणी रयत सेनेतर्फे करण्यात आली आहे. शुक्रवारी 17 रोजी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. पी. बाविस्कर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

उपचारासाठी धुळे किंवा खाजगी रुग्णालय
एखाद्या अपघाताची घटना घडल्यास या ठिकाणी सुविधा उपलब्ध नसल्याने थेट धुळे किंव खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागते. ग्रामीण रुग्णालयात आवश्यक सोई सुविधा नसल्याने त्यांना हा पर्याय अवलंबावा लागतो. अशावेळी गरीब जनतेला यामुळे मोठी आर्थिक झळ सोसावी लागते. जखमेवरचे मलम देखिल ब-याचदा उपलब्ध नसते किरकोळ आजाराच्या उपचारासाठी सोयी नाही. सध्या उन्हाळा असताना उष्मघाताचा रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच्यावर योग्य उपचारासाठी उष्मघात कक्ष उपलब्ध नाही.

यांची होती उपस्थिती
रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा पुरविण्याच्या मागणीचे निवेदन वैद्यकिय अधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा रयत सेनेने दिला आहे. निवेदन देतांना रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार,प्रमोद वाघ, पप्पु पाटील, संजय कापसे, गोरख साळुंखे, राजेश पाटील, दिपक राजपुत, देवेंद्र पाटील, विलास मराठे, स्वप्नील गायकवाड, पंकज पाटील, मयुर चौधरी, भुषण पाटील, विकास पाटील, बंडु पगार, चेतन पाटील, भिमराव खलाणे, उमेश पवार, गणेश बावीस्कर, गौरव नवले, बापु पाटील, अरुण देठे तुषार शहा आदी पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.

औषधांचा तुटवडा
चाळीसगाव शहरात रुग्णांच्या सेवेसाठी नगर परिषदेचा रुग्णालय होता मात्र तो बंद झाल्याने रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालय हा एकमेव पर्याय उरला आहे. त्यामुळे या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. शहराला लागुन अनेक गावे असल्याने रुग्णालयात येणार्‍या रुग्णांची संख्या ही मोेठी आहे. सद्दस्थितीत दवाखान्यात अद्यावत मशिनरी तर नाहीच नाही पलंग देखील जीर्ण अवस्थेत आहे. रुग्णांना आवश्यक असलेली औषध देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. साध्या खोकल्यावर देखील या ठिकाणी औषधोपचार होत नाही.