आरोपींच्या यादीत दिसतोय सलमान

0

मुंबई – विविध जाहिराती व चित्रपटात झळकणारा सलमान सध्या वन्यजीव प्राण्यांची शिकार करणाऱ्या आरोपींच्या यादीत दिसायला लागला आहे. सलमान खानचे नाव केंद्र सरकारच्या वाईल्ड क्राईम कंट्रोल ब्यूरोच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले आहे. सलमान खानला जोधपूर कोर्टाने काळवीट शिकार प्रकरणी ५ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. देशभरातील जंगली प्राण्यांची शिकार करणाऱ्या आरोपींवर रीतसर न्यायालयीन खटला चालवून शिक्षेची अमलबजावणी करण्यात येत आहे.

या प्रकरणाशी निगळीत आरोपींची माहिती मिळावी म्हणून शिक्षा सुनावलेल्या आरोपींचे छायाचित्र आणि त्यांची माहिती क्राईम कंट्रोल ब्यूरोच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येते. या यादीत आता सलमान खानचेही नाव प्रसिद्ध करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर आरोपी नंबर ३९ म्हणून सलमानचा पूर्ण तपशील देण्यात आला आहे. यामध्ये त्याला जोधपूर न्यायालयाने सुनावलेली ५ वर्षाची शिक्षा व दहा हजार रुपयांच्या दंडाची नोंद करण्यात आली आहे.