आरोपींना अटक होईपर्यंत ठिय्या आंदोलनाचा पवित्रा

0

अमळनेर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर विना परवाना रेती वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यासाठी पोलीस स्थानकात घेऊन जात असतांना तलाठीस झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ तलाठी संघटनेने जोपर्यंत आरोपीना अटक होत नाही, तोपर्यंत लेखणी बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दरम्यान तलाठी संघटनेने लेखणी बंद आंदोलन सुरू केल्याने तलाठी संघटना राजसारथी कार्यालयाजवळ ठिय्या मांडून आंदोलन सुरू केल्याने सर्व सामान्य नागरिकांना आता विविध प्रकारचे उतारे घेण्यासाठी अडचण येत असून नागरिकांची गैरसोय होत आहे.

लेखनीबंद सुरु
17 जानेवारी रोजी पिंगळवाडे येथील तलाठी योगेश पाटील हे तहसीलदारांच्या आदेशाने अवैधरित्या होणार्‍या गौण खनिजाला आळा घालण्यासाठी गस्तीवर गेले होते त्यावेळी त्यांना अंचलवाडी ते रणाईचे दरम्यान रस्त्यावर 3 विणापरवानगी रेती वाहतूक करणारे वाहने आढळून आली होती. सदर वाहने ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात जमा करण्यासाठी घेऊन जात असतांना त्यातील दोन वाहने बाजार समितीसमोर शितल देशमुख, योगीराज चव्हाण, उमेश वाल्हे, श्रीकांत पाटील,शिरीष पाटील व इतर 20 ते 25 लोकांनी अडवुन तलाठी योगेश पाटील यांना शिवीगाळ करून वाहणे सोडविण्यास सांगितले होते. परंतु योगेश पाटील वाहनांवर बसलेले असतांना आरोपींनी त्यांना वाहनाखाली ओढून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती. याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला असून अजूनही आरोपींना अटक न झाल्यामुळे संतप्त झालेल्या तलाठी संघटनेने लेखणी बंद आंदोलन पुकारले अजून जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे.