आरोपीची निर्दोष मुक्तता

0

जळगाव । चार वर्षापुर्वी विनयभंगाच्या दाखल गुन्ह्यात एकाची सबळ पुराव्याअभावी न्यायालयाचे निर्दोष मुक्तता केली. आरोपी विलास सुरेश जाधव यांच्याविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशन येथे भा.द.वि. कलम 354, 448, 506 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. पती घरी नसतांना रात्री घरात बेकायदेशिर प्रवेश करुनविनयभंग केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध विवाहितेची फिर्याद होती.

गुन्ह्यामध्ये तपासी अंमलदार पोकॉ. बडगुजर यांनी तपास करुन कोर्टात दोषारोप पत्र दाखल केले. त्याप्रमाणे कोर्टात फौजदारी खटला क्र. 1994/2013 चे कामकाज चालले खटल्यात सरकार पक्षाने एकुण 3 साक्षीदार तपासले. आरोपीची कोर्टाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. दिवाणी न्यायाधीश सो, डी. बी. साठे यांचे कोर्टातून निकाल दिला खटल्यामध्ये आरोपीतर्फे अ‍ॅड. सुनिल एस. इंगळे आणि अ‍ॅड. अभिजित एस लोखंडे यांनी काम पाहिले.