भडगाव ईशान पटेल या नऊ बालकाचे हत्या प्रकरण
जळगाव – जिल्ह्यातील भडगाव शहरात बेपत्ता असलेल्या ईशान बब्बु सैय्यद याचा 22 मार्च रोजी मृतदेह आढळून आला होता. त्याची हत्या झाल्याच्या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांचे रेखाचित्र जारी केले असून माहिती कळविणार्यास 50 हजारांचे बक्षीस जारी केले आहे. याबाबतची माहिती संबंधितांनी भडगाव पोलिस ठाण्यात कळविण्याचे आवाहनही जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.
आई-वडिल तसेच बहिणीनेही केली होती आत्महत्या
ईशान पटेल हा 21 मार्च रोजी अचानक बेपत्ता झाला होता. दुसर्या दिवशी सकाळी विचित्र अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांच्या चौकशीत कुणीतरी त्याची हत्या केल्याचे समोर आले होते. याबाबत भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. आठवडा उलटूनही संशयिताचा शोध लागला नाही. तपासात अनेक बाबी समोर आल्या मात्र संशयित कोण? त्याबद्दल पोलिस तपास करण्यात अपयशी ठरले. मुलाच्या विरहात तसेच त्याच्या मारेकर्याचा शोध लागत नसल्याने ईशानचे वडिल बब्बु लल्लन सैय्यद, आई पिंकी व बहिण स्नेहा या तिघांनी 1 एप्रिल रोजी सामुहिक आत्महत्या केली होती. या दरम्यान त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवल्याने पोलिसांच्या हाती या प्रकरणाचे काही धागेदोरे लागतील अशी शक्यता होती. मात्र आधीच ईशानच्या तपासात व्यस्त पोलिसांसमोर तिघांच्या आत्महत्येने पुन्हा मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मारेकर्यांच्या शोधासाठी पोलिसांनी त्याचे रेखाचित्र जारी केले आहे. तसेच त्याच्या वर्णनाची माहितीही त्यासोबत स्पष्ट केली आहे.