उल्हासनगर । चार दिवसांपूर्वी उल्हासनगर स्टेशनलगत वडापाव विक्रीच्या व्यवसायातून उध्दभवलेल्या वादातून वडापाव विक्रेत्याला भरदिवसा पेट्रोल अंगावर ओतून त्याला जीवंत जाळून ठार मारण्यात आले होते. त्या गुन्ह्यातील फरार आरोपीचा विठ्ठलवाडी पोलिसांसह गुन्हे अन्वेषण पोलिस शोध घेत असताना तो आरोपी स्वत: कोर्टात स्वाधीन झाल्याने विठ्ठलवाडी पोलिसांनी त्याचा ताबा घेतला आहे.
वडापाव विक्रीच्या व्यवसायातून झालेल्या वादाचा राग मनात धरून सुरेश आहुजा याने एका स्टीलच्या बादलीत पेट्रोल घेऊन चंदरालाल यांच्या अंगावर ओतून त्याला पेटवून दिले होते. ऐरोली येथील बर्न रूग्णालयात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी सुरेश आहुजा याच्याविरूध्द विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरेश हा फरार झाल्यामुळे विठ्ठलवाडी पोलिस तसेच उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस त्याचा सर्वत्र शोध घेत होते. सुरेश आहुजा यांनी उल्हासनगरातील चोपडा कोर्टात जाऊन त्याने कोर्टात शरणगती पत्कारली. त्याला 29 मार्चपर्यत पोलीस कोठडी दिली आहे.