पिंपरी : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील एस.बी.पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ण्ड डिझाईन या महाविद्यालयात ‘मृण्मय-द सिड’ या वार्षिक उत्सवाचे प्रकाशन अमिटी स्कुल ऑफ आर्किटेक्ट प्लॅनिंगचे संचालक प्रा. अभिजीत शिरोडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी पीसीईटीचे विश्वस्त भाईजान काझी, महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र सोनवणे, प्रा. गुरुदिप चिखलकर, प्रा. रुजुता पाठक, प्रा. अजय हराळे, ज्येष्ठ अभियंता दत्तात्रय कड, प्रा. स्वाती गोडबोले आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक गुरुदिप चिखलीकर, स्वागत प्राचार्य महेंद्र सोनवणे, सुत्रसंचालन प्रणाली भांबुरे, लिखिता मधुमतला आणि आभार प्रा. चित्रा श्रीवास्तव यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनास पीसीईटीचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, शांताराम गराडे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रशासन अधिकारी पद्माकर विसपुते यांनी मार्गदर्शन केले.