आर्किड हॉस्पीटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

0

जळगाव । उत्तर महाराष्ट्रात रुग्णसेवेत अग्रेसर असलेल्या ऑर्किड मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या वर्धापन दिनानिमित्त दि.15 ते 30 सप्टेंबर पर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात नावलौकिक असलेले ज्येष्ठ डॉ.नरेंद्र दोशी यांचा रुग्णसेवेचा वारसा त्यांचे पुत्र डॉ.परेश व स्नूषा डॉ.प्रिती दोशी हे दोघे ‘आर्किड’ हॉस्पीटलच्या माध्यमातून समृद्ध करीत पुढे नेत आहे. ‘ऑर्किड’ मध्ये अल्पावधीत दीड लाख व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून शेकडो हृदयशस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत, उच्च दर्जाची गुणवत्ता जोपासत वैद्यकीय सेवा हे ‘ऑर्किेड’चे मुख्य वैशिष्ट्य आहे. 30 सप्टेंबरपर्यंत अस्थिरोग, दंतरोग, बालरोग व कॅन्सर विषयी मोफत तपासणी शिबीरात तज्ञ डॉक्टर्स तपासणी व मार्गदर्शन करणार आहे तसेच बालरुग्णांना मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.शिबीराचा फायदा घ्यावा , असे आवाहन डॉ.परेश दोशी यांनी केले आहे.