नेरुळ । शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योगसाधना ही अत्यंत महत्वाची असल्याचे सिध्द झाले असून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात श्री श्री रविशंकर यांनी प्रास्थापित केलेल्या आर्ट ऑफ लिव्हींग या संस्थेच्या वतीने अर्ध्या तासाचे आरोग्य व आनंद लहरी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आर्ट ऑफ लिव्हींगच्या वरिष्ठ प्रशिक्षकांनी याप्रसंगी ध्यान, प्राणायम, योग आणि सुदर्शन क्रिया यांचे दैनंदिन जीवनशैलीतील महत्व विषद करीत विविध उपक्रमांची माहिती दिली. त्याचप्रमाणे प्राणायाम व ध्यानधारणा यांची सोपी प्रात्यक्षिके करून घेतली. या कार्यशाळेला महापालिका कर्मचार्यांनी, विषेत्वाने महिला कर्मचार्यांनी उत्तम प्रतिसाद दिला व समाधान व्यक्त केले. यापुर्वी अशाच प्रकारच्या शिबिरांचे आयोजन महापालिका रुग्णालये व शिक्षण विभाग याठिकाणी करण्यात आले आहे.