आर्ट ऑफ लिव्हींग परिवारातर्फे रक्तदान शिबिर

0

तळोदा। येथील आर्ट ऑफ लिविंग परिवारातर्फे परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांचा वाढदिवसानिमित्त तळोदा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन शनिवारी संत सावता माळी भवन येथे सकाळी करण्यात आले होते. या वेळी रक्तदानासाठी पुरुषांसह महिलांनी देखील मोठा सहभाग घेतला. या शिबीरात 50 जणांनी रक्तदान केले. यात नऊ महिलांचा समावेश होता.

आजाराने पीडित चिमुकलीसाठी शिबिर
रक्त संकलन करण्यासाठी धुळे येथील नवजीवन ब्लड बँकेचे डॉ.सुनिल चौधरी, दिलिप जाधव,गजानन चौधरी,सुभाष खैरनार, पाडुरंग गवळी,जुनेद शेख यांनी केले. तर रक्तदान शिबिराचे उद्दिष्ट हे शहरातील 7 वर्षीय दिक्षा गणेश गुरव ह्या चिमुरडीला थॅलेसेमिया हा दुर्धर आजार असून तिच्या पालकांना दरमहा सहज तिच्या उपचारासाठी रक्त उपलब्ध व्हावे म्हणून तसेच दिलेले रक्तदान हे आपल्याच कुठेल्यानं कुठल्या रुग्णास कामात यावे या कामी या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे तळोदा येथील आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे सांगण्यात आले. शिबिराचे आयोजन तळोदा येथील आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे सर्व सदस्यांनी केले होते.