यवतमाळ। आर्णी नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सुरू असताना शासकीय ठेकेदार शेखर खंदार आणि एका अज्ञात व्यक्तीने पालिकेचे उपाध्यक्ष राजीव पाडूरंग विरखेडे यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपालिकेची सर्वसाधारण सभा 29 ऑगस्ट रोजी येथील जुन्या न्यायालयाच्या सभागृहात घेण्यात आली होती. त्या दरम्यान जुन्या वादातून उपाध्यक्ष राजीव विरखेडे व शेखर खंदार या दोघामध्ये बाचाबाची झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडल्याने प्रचंड गोंधळ उडाला होता.
रात्री उशिरा फिर्याद
उपाध्यक्ष राजीव विरखेडे यांनी राञी उशीरा दरम्यान शेखर खंदार व एका अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेखर खंदार यांची भावसुन अंजली संदिप खंदार या नगरसेविका असून नेमका वाद कशामुळे झाला हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेले नाही. फिर्याद नगरपरिषद उपाध्यक्ष राजीव विरखेडे यांनी आर्णी पोलिसात मंगळवारी राञी 9 वाजता दरम्यान दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.