आर्थिकवर्ष जानेवारी ते डिसेंबर?

0

नवीदिल्ली । आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असावे, असा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निती आयोगाच्या बैठकीत मांडला. यासोबतच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी घेण्यात याव्यात, या भूमिकेचाही पंतप्रधान मोदींनी निती आयोगाच्या बैठकीत पुनरुच्चार केला. निती आयोगाच्या बैठकीला अनेक मुख्यमंत्र्यांची उपस्थिती होती. ‘वेळेच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे अनेक चांगल्या योजनांचा बोजवारा उडाला आहे. यासोबतच अनेक चांगल्या उपक्रमांना वेळेचे व्यवस्थापन चुकल्यामुळे अपयश आले आहे. त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी काही बदल आवश्यक आहेत,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी निती आयोगाच्या बैठकीला संबोधित करताना म्हणाले.