आर्थिक गुन्हे शाखेचे जळगावात छापे; दिग्गजांचे धाबे दणाणले

0

जळगाव– शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी-स्टेट कॉ ऑपरेटीव्ही बँकेतील मोठ्या प्रमाणावर अपहार तसेच फसवणूक प्रकरणात शुक्रवारी सकाळी पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव शहरात ठिकठिकाणी छापे टाकले आहेत. यात बीएआरच्या एमआयडीसीतील मुख्य कार्यालयासह बीएचआरमधील फसवणूक तसेच अपहाराशी संबंधितांकडे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांकडून चौकशी सुुरु आहे.

शहरातील बीएचआरप्रकरणातील अपहार तसेच फसवणूक प्रकरणात चौकशीसाठी पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनासाठी 136 जणांचे पथक शुक्रवारी सकाळी जळगावात धडकले आहेत. वेगवेगळ्या गाड्यांमधून आलेले पथकांकडून शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्ररित्या चौकशी केली जात आहे. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेच्या अचानकच्या या छाप्याने अनेकांमध्ये खळबळ उडाली आहे. बीएचआर फसवणूक प्रकरणात संबंधितांची चौकशी सुरु असल्याच्या वृत्ताला अधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे. सकाळपासून पथकांकडून संबंधितांकडे कागदपत्रांसह उपयुक्त सर्व माहिती, तसेच पंचनामा करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान ज्या ज्या ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु आहे. त्याठिकाणी संबधित हद्दीच्या पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांच्या बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.