आर्थिक पाहणी अहवाल: विकास दर ६ ते ६.५ टक्के राहणार

0

नवी दिल्ली: आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. यात २०२०-२१ मध्ये आर्थिक विकास दर ६ ते ६.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आर्थिक पाहणी अहवाल सादर झाल्यानंतर सभागृह उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले असून उद्या केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतील