VIDEO: आर्थिक सर्वनाशाचे कारण जीएसटीच; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

0

नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी देशाची आर्थिक परिस्थिती ढासळत चालल्याने मोदी सरकारवर सातत्याने टीका सुरु केली आहे. मागील आठवड्यात भारताचा जीडीपी (-२३) गेल्याने सर्वच स्तरावरून सरकारवर टीका होऊ लागली आहे. जीडीपीच्या घसरणीवरुन राहुल गांधींनी आज रविवारी मोदी सरकारावर निशाणा साधला आहे. जीडीपीमधील घसणीचेमोठ कारण म्हणजे जीएसटी असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले आहे. ट्विट करत राहुल गांधींनी मोदी सरकारला लक्ष केले आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहलेय की, “GDP मध्ये एतिहासिक घसणीचं आणखी एक कारण म्हणजे मोदी सरकाराचा गब्बर सिंह टॅक्स (GST) आहे. यामुळे खूप नुकसान झाले. लहान आणि मध्यम व्यापाऱ्यांचं नुकसान तर झालेच आहे शिवाय कोट्यवधी नोकऱ्या आणि तरुणांचा भविष्य.. तसेच अनेक राज्यांचं भविष्य…. जीएसटी म्हणजे आर्थिक सर्वनाश ”

मोदी सरकारचा गब्बर सिंह टॅक्स (GST)ने देशाचा सर्वनाश केला. गरिबांवर एक प्रकारचे आर्थिक आक्रमण आहे. छोटे छोटे दुकानदार, लहान आणि मध्यम व्यावसायिक तसेच शेतकरी आणि कामगारांवर आक्रमण आहे असे राहुल गांधींनी सांगितले.