भुसावळ- भुसावळ बाजारपेठ पोलिसात 5 एप्रिल 2019 रोजी आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र संशयीत आरोपी शेख इरफान शेख बशीर (25, रा.मिल्लत नगरए भुसावळ) हा पसार असल्याने त्याचा शोध सुरू होता. बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी मुस्लिम कॉलनीत आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
यांच्या पथकाने केली कारवाई
उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय गुळींग, उपनिरीक्षक मनोज ठाकरे, हवालदार सुनील जोशी, जयेंद्र पगारे, किशोर महाजन, विकास सातदिवे, गजानन वाघ आदींच्या पथकाने केली. हवालदार जयेंद्र पगारे करीत आहेत.