पुणे : आर्यमान सिंगने भारतात झालेल्या प्रत्येक गोल्फ स्पर्धा जिंकून अभुतपूर्व कामगिरी केली आहे. तसेच, त्याने २०१४, २०१५, २०१६ या सलग तीन स्पर्धा इंडियन गोल्फ युनियन-वेस्ट झोन मानांकन यादीत पहिला क्रमांक नोंदविताना ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आर्यमान सिंगची अपराजित वाटचाल आता १०२१ दिवसांपर्यंत पोहचली आहे. ही कामगिरी भारतीय गोल्फक्षेत्रात अतुलनीय अशीच आहे. २०१४ मधील सर्व स्पर्धा त्याने जिंकल्यानंतर २०१५ मध्येही त्याने पुणे, मुंबई, वडोदरा आणि अहमदाबाद येथील सर्व स्पर्धा जिंकून आपली अपराजित वाटचाल कायम राखली.
९ व्या वर्षी वरिष्ठ गटात खेळण्याचा मान
२०१६ मध्ये केवळ वयाच्या ९ व्या वर्षी त्याने वरिष्ठ ११ वर्षाखालील गटात खेळण्याचा मान मिळवला आणि त्यानंतर मुंबई, वडोदरा आणि अहमदाबाद या ठिकाणच्या स्पर्धा एकामागोमाग जिंकताना त्याने एकही पराभव न पत्करला नाही. मोसमातील पहिल्याच स्पर्धेत खेळताना दुसर्या दिवशी त्याने सर्वात कमी स्कोअरची नोंद करून १८ वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. आता आर्यमानचे लक्ष २०१७ मध्ये आणखी नवनवीन विक्रमांची नोंद करण्याकडे आहे. केवळ भारतांतील नव्हेच तर अधिकाधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जाऊन चमकदार कामगिरी करच्याचे त्याचे ध्येय आहे. २०१७ मध्ये युरोपियन आणि कुमार जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा आर्यमानचा मानस आहे.