जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेतील सहायक प्राध्यापक डॉ.आर.आर. चव्हाण यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून व्यवस्थापनशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी घोषित करण्यात आली. डॉ. आर.आर.चव्हाण यांनी वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेअंतर्गत व्यवस्थापनशास्त्र विषयात इफेक्ट ऑफ सव्र्हीस क्वॉलिटी ऑन कस्टमर लॉयल्टी व्हाया कस्टमर सॅटीसफॅक्शन इन ऑर्गनाईज्ड रिटेल सेक्टर: इव्हिडन्सेस फ्रॉम नॉर्थ महाराष्ट्र रिजन या शिषर्कांतर्गत प्रा. अनिल डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मार्गदर्शन केले होते. डॉ. चव्हाण यांची ही दुसरी पीएच.डी. पदवी आहे. डॉ.चव्हाण यांचे प्रशाळेच्या संचालिका प्रा.सिमा जोशी यांचेसह व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.