जळगाव। शहरातील रावसाहेब रुपचंद विद्यालयातील मुख्याध्यापक डी.एस.सरोदे यांना संस्थाचालक अरविंद लाठी यांनी माध्यमिक शिक्षण विभागाची परवानगी न घेता निलंबीत केले आहे. मुख्यध्यापकांला निलंबीत करण्यात आल्याच्या निषेधार्थ शाळेतील शिक्षकांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
मंगळवारी शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम केले होते. टप्प्याटप्प्याने निषेध नोंदविण्यात येणार असल्याचे सांगत शिक्षकांनी माध्यमिक शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्याची परवानगी माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांच्याकडून मागीतली. शिक्षणाधिकारी यांनी संबंधीत प्रकरण संस्थाचालकाशी संबंधीत असून शिक्षणविभागाकडे शिक्षकांची कोणतीही मागणी प्रलंबीत नसल्याने झेडपी समोरील आंदोलनाची परवानगी नाकारली. तसे पत्र शिक्षणविभागाला प्राप्त झाले होते शिक्षणाधिकारी यांनी पत्र पाठवून परवानगी नाकारली. यातच आता शिक्षक कोणता मार्ग अवलंबणार आता याची प्रतिक्षा आहे.