जळगाव। शहरातील रावसाहेब रुपचंद विद्यालय नेहमीच प्रकाश झोतातील विद्यालय आहे. संस्थाचालक अरविंद लाठी यांच्या विरोधात 68 शिक्षकांनी मानसिक छळवणुकीची तक्रार केलेली आहे. हा विषय राज्याच्या विधीमंडळात पंचतारांकीत विषय राहिलेला आहे.
दरम्यान संस्थाचालक अरविंद लाठी यांनी माध्यमिक शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता चुकीचे आरोप करुन मुख्याध्यापक डी.एस.सरोदे यांना निलंबीत केले आहे. काही दोष नसतांना सरोदे यांना निलंबन केल्याच्या निषेधार्थ विद्यालयातील शिक्षकांनी काळ्या फिती लावून विद्यार्थ्यांना शिकविले. तसेच जो पर्यत निलंबन मागे घेत नाही तो पर्यत निषेध नोंदविण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब केला जाईल असा इशारा शिक्षकांनी दिला आहे.