आर.आर.विद्यालयातील शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे

0

जळगाव। शहरातील इस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलीत रावसाहेब रुपचंद विद्यालय नेहमीच प्रकाश झोतात असते. संस्थाचालका विरुध्द विद्यालयाच्या शिक्षकांनी मानसिक छळवणुकीची तक्रार केल्याचे प्रकरण थेट विधीमंडळात मांडण्यात आला होता. त्यामुळे आर.आर.विद्यालयाचे नाव राज्यपातळीवर पोहोचले. संस्थाचालकाच्या मनमानी कारभारा विरोधात शिक्षक नेहमीच तक्रार करत असतात. दरम्यान संस्थाचालक अरविंद लाठी यांनी मुख्याध्यापक एस.डी.सरोदे यांचे बेकायदेशीररित्या निलंबन केले आहे. याविरोधात विद्यालयाच्या शिक्षकांकडून निषेध नोंदविण्यात येत आहे. मुख्याध्यापक सरोदे यांचे अन्यायकारक निलंबन मागे घेण्यात यावे यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीसमोर धरणे आंदोलन केले. शिक्षण तसेच इतर क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटनांनी सरोदे यांच्या निलंबनाचा विरोध करत धरणे आंदोलनात सहभाग नोंदविला.

संस्थाचालकाची हुकुमशाही
आर.आर.विद्यालयाचे संस्थाध्यक्ष अरविंद लाठी हे संस्थेअंतर्गत असलेल्या शिक्षकांची मानसिक छळ करतात यासंबंधी वारंवार तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. लाठी हे मनमानी कारभार करतात व हुकुमशाहीवृत्तीची वागणुक शिक्षकांना देत असल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे. हेकेखोरपणे, बेकायदेशीर, नियमबाह्य कारवाई करुन शैक्ष णिक क्षेत्रात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे धरणे आंदोलनास बसलेल्या शिक्षकांनी सांगितले.

सरोदे यांच्या काळात विकास
मुख्याध्यापक डी.एस.सरोदे यांच्या काळात आर.आर.महाविद्यालयाचा शैक्षणिक कार्यात मोठी प्रगती झालेली आहे. त्यांनी कार्यभार स्विकारल्यापासून संस्थेचा विकासात्मक आलेख चढता असल्याचे संस्थेतर्फे दरवर्षी प्रकाशित करण्यात येत असलेल्या प्रभाकर या नियतकालीकेतुन स्पष्ट होते. विविध स्पर्धा, क्रीडास्पर्धा, शासकीय चित्रकला स्पर्धा परीक्षा, स्काऊट गाईड, एन.सी.सी., आर.एस.पी., सांस्कृतिक विभाग, संगित, राज्यनाट्य स्पर्धा इत्यादी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन के ले आहे.

साखळी उपोषणाचा इशारा
मुख्याध्यापक यांचे निलंबन मागे घ्यावे यासाठी आर.आर.विद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी विविध प्रकारे निषेध नोंदवित आहे. निषेध नोंदविण्यासाठी एक एक मार्गाचा अवलंब करण्यात येत आहे. सुरुवातील शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम केले त्यानंतर आता एक दिवशीय धरणे आंदोलन केले. यापुढे जर निलंबन मागे घेतले नाही तर शिक्षक ांतर्फे साखळी उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. साखळी उपोषण केल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

शिक्षण विभागाची परवानगी नाही
माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाचे निलंबनाची परवानगी माध्यमिक शिक्षण विभागाकडून घेणे आवश्यक असतांना ते घेण्यात आलेली नाही. शिक्षण विभागाची परवानगी नसतांना निलंबन केल्याने संस्थाध्यक्षांची चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश शिक्षण सभापतींनी दिले आहे. लवकरात लवकर निलंबन मागे घेण्यात यावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.

निवेदन देण्यात आले
निलंबन मागे घ्यावे यासाठी शिक्षकांच्या वतीने उपमुख्याध्यापक व्ही.के.काबरा, विद्या कलंत्री, एन.आर.कुमावत, पी.एव.वानखेडे, पी.एस.यज्ञिक, बी.आर.बसेर, एस.एस.भोसले यांच्या शिष्टमंडळाने चौकशी अहवालावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी व आर.आर.विद्यालयावर प्रशासक नेमण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. शिक्षक संघटनेचे पदाधिकारी एच.जी.इंगळे, एस.डी.भिरुड, जे.के.पाटील, सी.डी.पाटील, आर.एच.बाविस्कर, तुकाराम बोरोले, सी.सी.वाणी, आर.डी.चौधरी, आर.आर.पाटील, साधना लोखंडे आदी उपस्थित होते.

प्रभारी मुख्याध्यापक चुकीचा
आर.आर.विद्यालयातील मुख्याध्यापक डी.एस.सरोदे यांना निलंबीत केल्यानंतर संस्थाचालकांनी त्यांच्या जागी प्रभारी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी एका नवनियुक्त शिक्षकांकडे दिली आहे. नवनियुक्त शिक्षकांला अद्याप वेतन देखील लागू झालेले नाही अशा प्रकारे प्रभारी मुख्याध्यापक नेमणे चुकीचे असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी सांगितले. नियमान्वये सेवा जेष्ठतेनुसार मुख्याध्यापकांची नेमणुक करणे आवश्यक होते. नेमणुकीचा अधिकार जरी संस्थेचा असला तरी आमच्याकडे तक्रार आल्यास नेमणुक रद्द करु असे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले.