जळगाव – शहरातील विजयनगरात दोन तरुणांनी आर.आर विद्यालयाचे शिक्षक गिरीश भावसार यांची दुचाकी आणून त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वाजता घडली. पूर्ववैमनस्यातून विद्यार्थ्यांनीच मारहाण केल्याची चर्चा असून जिल्हा पेठ पोलीस पुढील तपास करत आहेत . दरम्यान मारहाण करणारे तरुण एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे