जळगाव । मुलांचे भांडण सोडविण्यास गेलेल्या युवकावर चाकु हल्ला करण्यात आला असल्याची घटना गुरूवाररोजी सायंकाळी आर.आर.विद्यालयाजवळ घडली. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर विद्यालया जवळ काही मुलांचा गोंधळ व भांडण सुरू होते. ते भांडण मिटविण्यासाठी जुने जळगाव येथील संदीप भावसार हा गेला असता. मुलांचे भांडण बाजुला राहून 8 ते 10 युवकांनी संदीप यास मारहाण करण्यास सुरवात केली. दरम्यान एका युवकाने धारदार शस्त्राने संदीपच्या डाव्या हातावर व दंडावर वार केला.त्यात तो जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याची कारवाई सुरू होती. तसेच चौकशीसाठी काही युवकांना ताब्यात घेतले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.