आर.आर.विद्यालयात‘बॉक्स ऑफ हेल्प’चे वितरण

0

जळगाव । येथील आर.आर. महाविद्यालयात नुकताच बॉक्स ऑफ हेल्प गृप पजळगावच्या वतीने बॉक्सचे वितरण व सत्कार समारंभ करण्यात आला. या वेळी शाळेच्या 22 नं हॉल मध्ये कार्याक्रम घेण्यात आला. कार्याक्रमात प्रमुख अतिथि म्हणून जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या कविता भुजबळ हे होत्या. तर शाळेचे चेअरमन दिलीपभाऊ लाठी अध्यस्थानी होते. या वेळी मान्यवरांचे पुच्छ गुच्छ देवून स्वागत करण्यात आला. प्रस्तावीक प्रकल्प प्रमुख सुधा काबरा यांनी केले.

मुलींचे भावविश्‍व फुलविणार…
किशोरवयीन, वयात येणार्‍या मुलींना अनेक मानसिक, शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्या समस्या सोडवून मुलींचे भावविश्‍व फुलविण्याचे ध्येय बॉक्स ऑफ हेल्प गृप सुधा काबरा यांनी घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आर.आर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात नुकताच तीन बॉक्स ऑफ हेल्थचे वितरण करण्यात आले. शाळेचे प्राचार्य योगेश चौधरी, तसेच इतरही शाळेतील मुख्याध्यापक यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. मालती गायकवाड, मुंदडा शाळा, मनिषा पाटील, प्रगती माध्यमिक शाळा, श्रध्दा दुनाखे, छाया भोळे, ज्ञानसाधना माध्यमिक, मिनाक्शी अत्तरदे, मनपा शाळा 50, डॉ.मनिषा कोल्हे, डॉ.माधुरी कासट, डॉ.अर्पणा मकासरे, डॉ.सुमन लोढा. विजय लाठी, पुरूषोत्तम काबरा,राजेश जावराणी माजी रोटरी अध्यक्ष मीनल लाठी, , शुभ्रा व्यास, माधवी असावा, पूनम महाजन, सपना तिवारी, स्वाती अग्रवाल, गृप च्या सर्व सदस्या व मान्यवर उपस्थित होते.

न्यूनगंड टाळणार
किशोरवयीन मुलांना अनेक समस्या असतात. त्या समस्या शारीरिक, मानसिक इतरही असतात. त्या समस्या युवती पालक, आई वडिलांना सांगू शकत नाही. यामुळे त्यांच्यात न्यूनगंड येतो. समस्येमुळे त्यांच्यातील आत्मविश्‍वास कमी होतो. हे टाळण्यासाठी काबरा यांनी उपक्रम सुरू केला आहे. यात युवतींनी त्यांच्या समस्या लिहून टाकायचा आहेत. त्यात आलेल्या समस्यांवर त्यांना तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करून योग्य सल्ला देण्यात येणार आहे. भुजबळ यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना सांगितले की मुलींची जर छेडछानी होत असेल, कोणा क डुन त्रास दिला जात असेल तर त्यानी निर्भया पथकाशी त्वरीत संपर्क साधावा. आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या वेळी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांचे ही सहकार्य लाभले.