शेंदुर्णी । येथील स्व. स्व. शेठ राजमल लखीचंद ललवाणी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचा मार्च 2017 इ. 12 वी चा निकाल विज्ञान शाखा 100 टक्के, वाणिज्य 100, कला 95 यक्के विज्ञान शाखेतून प्रथम नितीन अच्युतराव म्हस्के 82.30, द्वितीय नरेंद्र राजु नागपुरे 81.23, तर तृतीय विभागून गणेश ज्ञानेश्वर पाटील 80.46, वैष्णवी गजानन कोल्हे 80.46, वाणिज्य शाखा यंदाही 100 टक्के निकाल लागला असून प्रथम कोमल ताडे 81.69, आदित्य जोशी 80.92, तृतीय दिपाली लहासे 80.76 टक्के, कला शाखेचा निकाल 95 टक्के लागला असून प्रथम रुपाली गेठे 81.23, द्वितीय अश्विनी चव्हाण 78.46, तृतीय मर्जिना बनेखा तडवी 72.15 टक्के असा निकाल लागला आहे.
गरूड विद्यालयात विज्ञान शाखेचा निकाल 97.92 टक्के: आचार्य गरूड महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा निकाला 97.92 टक्के लागले असून यशाची उज्वल परंपरा कायम राखत बारावीच्या निकालात यशाचे मानकरी याप्रमाणे रूपाली अशोक पाटील 82.61 टक्के, तेजस श्यामसिंग हजारी 76.15 टक्के, दक्षता साहेबराज महाले 75.53 टक्के, लोकेश संदीप ललवाणी 75.38 टक्के, दिपाली सोपान पाटील 73.69 टक्के तर किमान कौशल्या विभागातून वैभव सुनिल गोंधनखेडे 67.84 टक्के, प्रफुल्ल अमृत दिगावकर 61.07 टक्के, आनंद सुपडू मोरे 60.61 टक्के याप्रमाणे लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जामनेर तालुक्यात कला, वाणिज्य व विज्ञान तिनही शाखा एकत्र असलेले कॉलेज असून तिनही शाखेचा निकाल जामनेर तालुक्यात नंबर वन आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार ईश्वरबाबूजी जैन, संस्था सचिव माजी आमदार मनिषदादा जैन, मार्गदर्शक सुरेशचंद्रजी साबद्रा संस्था समन्वयक प्रा. अतुल साबद्रा, मुख्याध्यापक पी.टी. खलसे, सर्व प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिकचे सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.